Tour to Anandwan – Hemalkasa

Inspirational Social Tour to Anandwan, Hemalkasa and Somnath project, founded by Late Baba Amte and now is being managed by his sons Dr. Vikas Amte and Dr. Prakash Amte

Tour Dates :
16th to 19th February 2023

डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या आनंदवन व हेमलकसा ह्या प्रकल्पांना भेट देण्याची इच्छा अनेकांना असते. सन २००९ पासून  उन्नयन टूर्सच्या माध्यमातून अक्षरशः हजारो पर्यटकांनी ह्या अनोख्या प्रकल्पांना भेट दिली आहे. उन्नयन टूर्ससोबतची ही प्रकल्प भेट म्हणजे हे अनोखे प्रकल्प जवळून अनुभवण्याची आणि ह्या अनोख्या माणसांशी थेट संवाद साधण्याची ही एक सुसंधीच.

आनंदवन – १९५१ साली बाबा आमटे ह्यांनी केवळ कुष्ठरोग्यांसाठी सुरु केलेला हा छोटासा प्रकल्प आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रुपांतरीत झाला आहे. आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस, डेअरी असे नानाविध उपक्रम राबवले जातात. देशातला सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प इथे आहे. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद, केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला,  हाताची बोटेच नसलेल्या गोविंदाचे काष्ठशिल्प प्रदर्शन ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्य.

लोक बिरादरी प्रकल्पहेमलकसा – १९७४ साली गडचिरोलीच्या निबिड जंगलात भारतातील सर्वात मागास अश्या माडीया, गोंड ह्या आदिवासी जमातींसाठी सुरु झालेला हा प्रकल्प. वर्तमान जगाशी कुठलाच संबंध नसलेल्या ह्या आदिवासींना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकार्यांनी आज नवी ओळख दिली आहे. रूग्णालयानंतर सुरु झालेल्या लोक बिरादरीच्या शाळेत शिकलेली मुले आज डॉक्टर, इंजिनियर होत आहेत. डॉ. प्रकाश आमटे ह्यांचे प्राण्यांचे अनाथालय हे सुद्धा प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य.

सोमनाथ – श्रमिक विद्यापीठाच्या संकल्पनेतून साकारलेला, विदर्भाच्या दुष्काळी भागात आनंदवनातील पुनर्वसित माणसांनी फुलवलेला हा शेतीचा स्वर्गच! पाण्याच्या नियोजनाचे यशस्वी प्रयोग करीत आज सोमनाथ प्रकल्प  देशातील कृषी प्रक्रियेचं एक आदर्श मॉडेल बनला आहे. पाणी अडवण्यासाठी येथे श्रमदानातून बांधलेले तलाव, विशेषत: टाकाऊ वस्तूंमधून बांधलेला टायरचा बंधारा ही सोमनाथ प्रकल्पाची आणखी काही वैशिष्ट्य.

Itinerary in Brief

15th FebDepart at 8:15 pm from Mumbai CST by 12289 Mumbai Nagpur Duranto Express
16th FebArrival at 7:20 am in Nagpur and proceed for Anandwan (108 km / 2 hrs)
Anandwan Project Visit
Meet with senior volunteers available on project
Meet Amte family (if available)
Night Stay at Anandwan
(Breakfast, Lunch, Dinner)
17th FebAnandwan Project Visit
After lunch, proceed for Hemalkasa (235 km/ 5 hrs)
Night Stay at Hemalkasa
(Breakfast, Lunch, Dinner)
18th FebMeet Amte family (if available)
Hemalkasa Project Visit including Animal arc, School & Hospital
After lunch, proceed for Somnath Project (200 km / 5 hrs)
Enroute, Visit Nagepalli Project
Night Stay at Somnath Project
(Breakfast, Lunch, Dinner)
19th FebSomnath Project Visit
After Lunch, proceed for Nagpur (200 km / 5 hrs)
Arrival at Nagpur by 7:00 pm and depart for Mumbai at 8:40 pm by 12290 Nagpur Mumbai Duranto Express
(Breakfast, Lunch, Dinner)
20th FebArrival at Mumbai CST at 8:05 am
Tour ends with inspirational memories

In any prevailing circumstances, we reserve the rights to alter above itinerary without prior notice.

Tour Cost –
Rs. 13,500/- Per Person + Train Fare

Advance –
Rs.  7,500/- Per Person + Train Fare

Tour Cost Includes –
Accommodation on common sharing basis, Nagpur to Nagpur AC Transportation, All Veg Meals as per itinerary, All Entry Fees, Guide Charges & Taxes.

Tour Cost Excludes –
Train fare, Mumbai to Nagpur dinner in train & any kind of personal expenses.

Payment Terms:
Participant will be confirmed only against the payment of advance. You can directly transfer the funds to our ICICI Bank account. Bank details are available in book now section.

For your convenience, we can also book your Train Tickets for this tour without charging anything extra other than actual train fare.

If you have any question, please feel free to call / WhatsApp us any moment on 9773510513 or 9967534396